Categories: नांदेड

कोरोना रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट पोहचले वार्डात

नांदेड, बातमी24:- उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुविधा मिळतात की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांशी चर्चा केली. हे पाहून अनेक रुग्णांना सुखद धक्का बसला. मात्र वार्डात जाण्यापूर्वी डॉ. इटनकर यांची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेतली. रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणारे डॉ. इटनकर हे बहुदा पहिले राज्यातील जिल्हाधिकारी असावेत.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी गुरुवार दि. 18 जून रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटर दिली. त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, बालरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद चव्हाण, औषध वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड हे होते.

सुविधेबाबत आढावा घेण्यासाठी डॉ. इटनकर हे आले होते. या वेळी संपूर्ण परिसराची पाहणी केली. याठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा अधिक परिपूर्ण व्हावी यासाठी महानगरपालिकाअंतर्गत स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था तात्काळ कशी करता येईल याचे नियोजन करण्यासाठी भेट दिली होती.

येथील कोविड डेडीकेटेड सेंटरला आपण आलोच आहोत तर प्रत्यक्ष बाधित पेशंट यांच्याशी चर्चा केल्यास नेमकी माहिती आपल्याला मिळेल म्हणून या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन त्यांना भेटण्याचा निर्णय घेतात. या वेळी पीपीईकीट घालून सुरक्षिततेचे जे नियम आहेत. त्याचे पालन करुन ते सरळ कोविड डेडीकेटेड वार्डात जाऊन पॉझिटिव्ह पेशंटशी चर्चा करतात. या वार्डात असलेल्या 17 बाधितांबरोबर गप्पा मारल्या.

स्वत: जिल्हाधिकारी येथे येवून प्रत्यक्ष पाहणी करुन सुविधा कशा मिळतात याची सहानुभूतीने चौकशी केली. इथल्या सुविधा तुम्हाला चांगल्या वाटतात का ? काही अडचणी आहेत का ? आहार चांगला मिळतो का ? याची ते सरळ पेशंटला विचारणा केली. घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल असा विश्वास डॉ. विपीन यांनी रुग्णांना दिला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago