नांदेड, बातमी24ः- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार दि. 14 जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताबदी दिनाचा मुहर्त साधत माध्यमांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनासंबंधी प्रेसनोट वगळता इतरत्र सुत्रांकडून मिळालेली माहिती प्रसारित करण्यावर प्रतिबंध केला आहे. या निर्णयाचा माध्यमात काम करणार्या पत्रकार मंडळींना धक्का बसला आहे. अशा प्रकारचा अजब निर्णय घेऊन डॉ. इटनकर यांनी नव्या वादाला तोंड फ ोडले आहे.
मंगळवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की जिल्ह्यातील कोविडसंबंधीची माहिती सिव्हील सर्जनच्या माध्यमातून दररोज प्रेसनोटच्या माध्यमातून अधिकृतरित्या दिली जाते. सदरच्या प्रेसनोटमध्ये अद्यावत माहिती नमूद असते. मात्र असे निदर्शनास येते आहे, की प्रेसनोट येण्यापूर्वीच अनाधिकृतपणे कोेरोना रुग्णांची माहिती ही सिव्हील सर्जनकडे येण्यापूर्वी लिक होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.
यापुढे प्रशासनाने असा निर्णय घेतल आहे,की दररोज केवळ एक प्रसनोटव्दारे सायंकाळी पाच वाजता सिव्हल सर्जनकडून माहिती दिली जाईल, सिव्हील सर्जन यांच्याअधी कुणाकडे माहिती उपलब्ध झाली आणि ती अनाधिकृतरित्या उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी ,असे कळविले आहे.
मुळात जिल्हाधिकार्यांचे वरील पत्र पाहता कोविड-19 संबंधी माध्यमांमधून चुकीची माहिती प्रसारीत होत असल्यास दंडात्मक कारवाई करणे योग्य ठरते. पत्रकारितेच्या मापदंडात सुत्र हा महत्वाचा भाग आहे. सुत्रांच्या आधारे अचूक माहिती वाचकापर्यंत देणे गैर ठरत नाही. दुसरी बाब प्रशासनाकडून येणारी प्रेसनोट बर्याच वेळा अपूर्ण, अधर्वट माहिती आधारे दिली जाते. प्रशासनाकडून आलेली प्रेसनोट जशास-तशी छापणे म्हणजे, माध्यमांच्या हक्कावर गंडात्तर आणणे असेच होऊ शकते.
सिव्हील सर्जन यांच्याकडे माहिती येण्यापूर्वी ती लिक होत असेल, तर प्रशासनाचे यंत्रणेवर नियंत्रण किंवा अंकुश नाही, हे सिद्ध करणारे ठरते. सदरची प्रशासनाची अंतर्गत बाब असू किंवा समजू शक तो. परंतु प्रशासनाकडून कोविड-19 संबंधीची माहिती आम्ही देऊ तिच माहिती छापा हे सांगणे म्हणजे माध्यमांचे स्वातंत्र हिरावून घेणे असेच होऊ शकते. प्रशासनाकडून येणार्या माहितीमध्ये अनेक प्रश्नांसह उपप्रश्न निर्माण होत असतात. यासंबंधी कुणीच माहिती देत नाही. उलट एकमेकांची नावे सांगत जबाबदारी झटकली जाते.
——
इतर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचे स्वॅब आले,की माहिती तात्काळ कळविली जात असते. तसे नांदेडच्या प्रशासनाकडून ही कळविण्यात येत असत. परंतु मागच्या काही दिवसांपासून चौविस तासातून एकाच वेळी माहिती दिली जाईल, असा वटहुकुम माध्यम कार्यावर मर्यादा घालणार आहे, त्यामुळे जिल्हाधिकार्यांचा निर्णय अजब ठरतो.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…