नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या बदलीची चर्चा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली. मात्र कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे समोर आले. बदलीच्या चर्चांना पैव फ ोडणारे प्रशासनातील तर नव्हे अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
शुक्रवारच्या रात्री जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची बदली होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. प्रत्येक जण एकमेकांना कॉल किंवा सोशल मिडियावर चॅटव्दारे चौकशी करत होते. ही चर्चा बर्याच वेळ रात्री चालली आहे. काही उत्साही पत्रकार, पुढार्यांनी अधिकार्यांना खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला.मात्र तसे काही नसल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. बदली संदर्भात सुत्र लागत नसल्याने बदलीबाबत माहिती जाणून घेणार्यांचे समाधान होत नव्हते.
आतापर्यंत बडया अधिकार्यांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा निघाल्याचे आठवत नाही. मग अचानक बदलीचा जावईशोध कसा व कुठून लागला. याची उकल होऊ शकली नाही.मात्र बदलीची चर्चा तुफ ान चालली. डॉ. इटनकर यांच्या जागी सोलापूर महापालिका आयुक्त शिवशंकर हे येणार अशी चर्चा होती. प्रशासनाकडून यास दुजोरा मिळू शकला नाही. त्यामुळे चर्चा चर्चाच ठरली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…