नांदेड, बातमी24ः नांदेड शहरात गावठी पिस्टल साडत असताना आणि गोळीबार होत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे मात्र सायकलवर पाहणी करत फि रत आहेत. डॉ. इटनकर यांचा एक फ ोटो व्हायरल झाला आहे. यात ते रात्री सायकलवर चालवित असल्याचे दिसत आहेत.
जिल्हाधिकारी म्हणून नांदेड येथे आल्यापासून डॉ. विपीन इटनकर यांच्या मागे कोरोनाचे संकट लागले. पूर्ण वेळ ते कोरोनाच्या आपत्तीशी लढत आहेत. मात्र अलिकडे हळहळू त्यांनी वाळू माफि यांचे कंबरडे मोडायला सुरु केले आहे. नांदेड, मुदेखड येथील वाळू माफि यांनी बसविलेले बस्तान उडवून लावले आहे. याच तहसीलदारांना हात काळे करून घ्याल तर तुम्ही आणि मी असेल असा इशारा दिला आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये अवैध वाळू उपशावर जिल्हाधिकार्यांनी लावले नियंत्रण पाहता, अनेक वाळू माफि यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी वाळूमाफि यांकडून अधिकार्यांवर जिव घेणे हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच नांदेड शहर हे गँगवारचे माहेरघर बनत आहे. गावठी पिस्टल कुणाकडे मिळेल हे सांगता येत नाही.
सायन्य कॉलेज जवळील पाण्याचा पाईप फु टल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याची तक्रार डॉ. इटनकर यांच्याकडे करण्यात आली होती. घटनास्थळी महापालिका आयुक्त डॉ. लहानकर यांना ही बोलावून घेतले होते. शासकीय बंगल्यापासून सायन्स कॉलेज जवळ असल्याने ते सायकलवरच गेले होते, असे सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…