नांदेड

पंचायती ‘राज’च्या दृष्टीने प्रशासनाकडून रंगीत सुरू तालिम

नांदेड,बातमी24: पंधरा दिवसांच्या लांबणीवर पडलेल्या पंचायती राज समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.दौरा लांबणीवर पडला,तरी त्या-त्या विभागातील अभिलेखे अद्यावत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.जिल्हा परिषदेची प्रतिमा पंचायती राज समितीसमोर उंचावली पाहिजे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर काटेकोरपणे आढावा बैठक घेत असून त्रुटी भरून काढण्यासाठी विभागप्रमुखाकडून कसून तयारी करून घेत आहेत.

राज्य शासनाची सर्वात मोठी अशी जम्बो आमदारांची पंचायती राज समिती नांदेड जिल्हा परिषदेची पाहणी करण्यासाठी दि.11,12 व 13 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होती. मात्र जिल्हा परिषदेला तयारी करण्यासाठी आवधी अत्यल्प मिळत होता.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायती राज समितीला विनंती करण्यात आली होती. या विनंतीला मान राखत समितीने पुढील महिन्यात दि.2,3 व 4 सप्टेंबर रोजी येणार आहे.

ही समिती सन 2016-17 च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल यसेच 2017-18 अहवालाची तपासणी ही समिती करणार आहे. या समितीमध्ये अभ्यासू व जाणकार आमदारांचा समावेश आहे.

या समिती दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदकडून कुठल्याही प्रकारची उणीव राहता कामा नये,अद्यावत व अचूक अहवाल समितीसमोर जायला हवा,यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसमवेत मैरेथॉन आढावा बैठका घेणे सुरू केले आहे. यशदा पुणे येथील सीईओ कार्यशाळा संपताच वर्षा ठाकूर पंचायती राज समिती दौऱ्याच्या तयारीला लागल्या आहे. मंगळवारी उशिरपर्यत आढावा बैठक घेतल्यानंतर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीनंतर दुपारनंतर मल्टीपर्पज येथे आढावा सुरूच होती.विभागवार बुकलेट समोर ठेवून पॉईंट टू पॉईंट माहिती घेणे सुरू आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago