नांदेड, बातमी24ः मागच्या चौविस तासांच्या आत सात जणांनाचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 129 झाली आहे.
यामध्ये नांदेड तालुक्यतील धनेगाव येथील 53 वर्षीय महिलेचा दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता मृत्यू झाला. या महिलेस दि. 7 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.नाईक नगर भागात राहणार्या 78 वर्षीय पुरुषाचा दि. 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. नंदीग्राम सोसायटीमधील 53 वर्षीय पुरुषाचा दि. 13 रोजी मृत्यू झाला. वजिराबाद भागातील 58 वर्षीय पुरुषाचा दि. 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
नायगाव येथील 65 वर्षीय व्यापार्याचा एका खासगी रुग्णालयात दि. 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.मुखेड येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि. 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला, तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एका रुग्णास सुट्टी देण्यात आली होती. परंतु त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णांचा दि. 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. मागच्या चौविस तासांमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 7 तर आतापर्यंत 129 झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…