नांदेड, बातमी 24ः– सायंकाळनंतर पुन्हा दोन रुग्ण वाढले, तर कौठा भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दगावणारांची संख्या 17 झाली, असून रुग्णसंख्या 373 वर पोहचली आहे.
सोमवार दि. 29 रोजी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर चार रुग्ण वाढले होते. यानंतर पुन्हा 11 नमून्यांचा अहवाल घेण्यात आला. यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये शिवाजी नगर भागातील 32 वर्षीय महिला व छत्रपती चौक भागातील 57 वर्षीय इसमाचा समावेश आहे.
नवा कौठा भागातील बिग बाजार जवळ राहणार्या 53 वर्षीय पुरुषाचा सोमवारी सांयकाळी मृत्यू झाला. या पुरुषास 27 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तर दि.28 जून रोजी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मरणारांची संख्या 17 झाली आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 373 तर उपचार घेणारे रुग्ण हे 76 झाले आहेेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…