नांदेड,बातमी24 : मराठवाड्याच्या आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कथा कल्चरल असोसिएशनचे संस्थापक सदस्य प्राचार्य अशोक अशोक नवसागरे व नांदेड आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक तथा ‘कल्चरल’ चे अध्यक्ष भीमराव शेळके यांचे आकस्मिक जाणे हे खूपच वेदनादायी आहे. या केवळ व्यक्ती नव्हत्या तर परिवर्तनवादी चळवळीचे प्रबळ ऊर्जा स्त्रोत होत्या. त्यांनी जीवनात अंगिकारलेली प्रखर तत्त्वनिष्ठा जपणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा भावना आदरांजली सभेस उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
प्राचार्य अशोक नवसागरे आणि भीमराव शेळके यांचे कोरोना काळात दुःखद निधन झाले. कल्चरल असोसिएशनच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र गोणारकर होते तर मंचावर भदंत विनय बोधीप्रिय महाथेरो उपस्थित होते. साठच्या दशकापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत प्राचार्य अशोक नवसागरे सामाजिक राजकीय आणि धार्मिक चळवळी सदैव आघाडीवर होते. डी. एस. फोर, बहुजन समाज पार्टी यामध्ये त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने अत्यंत अभ्यासू निगर्वी आणि माणसांवर प्रेम करणारा माणूस आपण गमावला आहे. तर भीमराव शेळके यांनी नांदेड आकाशवाणी केंद्राला सामान्य माणसाचा चेहरा दिला. वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याची त्यांची हातोटी प्रशंसनीय होती. कलासक्त मनाचे उमदे नि मनस्वी माणूस असणारे भीमराव शेळके यांच्या जाण्याने सामान्यांचा आवाज हरपला आहे. अशा भावना या वेळी भदंत विनय बोधीप्रिय महाथेरो , प्राचार्य विकास कदम, कल्चरलचे कोषाध्यक्ष प्रदीप दांडगे, इंजि.भीमराव हाटकर, अरुणाताई नरवाडे, अनुराग शेळके, विमलताई नवसागरे, डॉ. अनंत राऊत आदि मान्यवरांनी व्यक्त केल्या. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नवसागरे आणि शेळके यांच्या जाण्याने ‘कल्चरल’चे आधारस्तंभ निखळले आहेत. तथापि त्यांचे स्मरण जागे ठेवत कल्चरल वाटचाल करेल, असे सांगितले. यावेळी स्मृतीशेष भीमराव शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कल्चरल’च्या वतीने दरवर्षी व्याखानाचे आयोजन करावे, या उपक्रमासाठी शेळके परिवार अर्थ सहाय्य करेल , असे भीमराव शेळके यांचे सुपुत्र अनुराग शेळके यांनी जाहीर केले. तसेच भीमराव शेळके यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या कल्चरल असोसएशनच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांची काळजीवाहू अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन धम्मराज उर्फ मारोतराव धतुरे केले. यावेळी सुरेश थोरात, डॉ. नरवाडे, डॉ. श्रीहरी कांबळे, चंद्रकांत ढोले, एस. जे. शिरसे , नितिन एंगडे आदि उपस्थित होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…