नांदेड

तरुण- तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू; नवे अकरा रुग्ण पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे मागच्या चौविसा तासाच्या आत तीन जणांचा बळी घेतला, असून बळींची संख्या 27 झाली आहे. औरंगाबादनंतर सर्वाधिक बळींची नोंद नांदेड जिल्ह्यात नोंदविली जात आहे. तर शनिवारी सकाळी काही नमुन्यांचा स्वॅबमध्ये अकरा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 569 झाली आहे.

शुक्रवारी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांंची भर पडली होती. तर कंधार तालुक्यातील इमामवाडी येथील 52 वर्षी इसमाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला.


—–
28 पुरुष तर 33 महिलेचा सुद्धा मृत्यू

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात मरणारांची संख्या पन्नाशीच्या पुढे होती. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे तारुण्यात महिला व एक पुरुषाचा बळी जाण्याची बहुदा पहिलीच नोंद आहे. नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथे राहणार्‍या 28 वर्षीय तरुणाचा स्वॅब दि.9 जुलै रोजी पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी रात्री मृत्यू झाला. याचसोबत तेलीगल्ली येथील 33 वर्षीय महिलेचे स्वॅब दि. 3 जुलै रोजी पॉझिटीव्ह आले होत. या महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
——-

पॉझिटीव्ह रुग्णांची माहिती सविस्तरपणे
पत्ता————स्त्री/पुरुष————वय
1)नागणी(बिलोली)—पुरुष————30

2)कुंडलवाडी(बिलोली)-पुरुष————26

3)तेली गल्ली(भोकर)—स्त्री————33

4)मुखेड————-स्त्री————30

5)मुखेड————-स्त्री————45

6)बाजार मोहल्ला(मुदखेड)-पुरुष———-40

7)बाहेगाव(देगलूर)——पुरुष———-36

8)वजिराबाद(नांदेड)——पुरुष———-64

9)बळीरामपुर(नांदेड)—–पुरुष———-28

10) तिरेबोर(नांदेड)—–पुुुरुष———–32

11) वाल्मिकी नगर—–पुरुष———–44

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago