नांदेड

18 डिसेंबर हा दिवस “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून होणार साजरा:-जिल्‍हाधिकारी राऊत यांची माहिती

नांदेड,बातमी 24 :-प्रत्‍येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून राबविण्‍यात येतो. त्‍याअनुषंगाने सोमवार 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता सदर कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून गुरूद्वारा सचखंड बोर्ड नांदेडचे समुदाय अधिकारी मनदिपसिंघ टाक व जिल्‍हा व सत्र न्‍यायालय नांदेडचे अॅड सय्यद अरिबुद्दीन हे संबोधित करणार आहेत. अल्‍पसंख्‍यांक समाजातील नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेने दिनांक 18 डिसेंबर 1992 रोजी राष्‍ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्‍पसंख्‍याकांच्‍या हक्‍काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्‍तृत केला आहे. त्‍यानुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांची संस्‍कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्‍यादींचे संवर्धन करता यावे यादृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याबाबत राष्‍ट्रीय आयोगाने सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रत्‍येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून राबविण्‍यात येतो.

अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक दिनांक 29 नोव्‍हेंबर 2023 नुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक व कायदेशीर हक्‍कांची जाणीव / माहिती देण्‍यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात यावेत असे सूचना प्राप्‍त आहेत. तसेच या दिवसाच्‍या निमित्ताने अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago