नांदेड, बातमी24:-नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय व नांदेड शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोल यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र सुरू असून यामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब शेतकऱ्याचे होणार आहे. कारण शेती संदर्भात केंद्र सरकारने तीन कायदे पारीत केले आहेत. ते जाचक आहेत. शेतकरी हिताचे नाहीत या नवीन तीन कायद्यास वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे. या तीन कृषी विरोधी कायद्या मुळे शेतकरी भूमिहीन भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडी या विरुद्ध अनेक दशकापासून लढत आहे.
सदरील कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभाव खरेदी करण्याची मुभा कंपन्यांना मिळेल व हमीभावची व्यवस्था संपुष्टात येईल. त्याचप्रमाणे व्यापारी व कंपन्याना साठेबाजी करण्याची काय देखील भुमा मिळेल. हे जाचक कायदे आहेत. ते शेतकरी हिताचे नाहीत. ह्या नवीन कायद्यास वंचित बहुजन आघाडी चा विरोध आहे. शेतकरी विरोधी कायदा परत घ्यावा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हातील नांदेड शहर, अर्धापुर तालुका, हदगाव तालुका, भोकर तालुका, मुदखेड तालुका, किनवट तालुका, माहूर तालुका, हिमायतनगर तालुका तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन चालणार आहे.
शेतकऱ्याच्या विरोधात केलेल्या काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी 27 जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर समोर व जिल्हाधिकारी कार्यालय समोर शुक्रवारी, 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुका व शहर अध्यक्षांनी कार्यकर्त्याचे उपस्थित रहावे. असे आवाहन नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धकात म्हटले केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago