नांदेड

डिएचओ डॉ.शिंदे यांच्या अभिनंदन ठरावाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले;कोरोनात ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तहकूब सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी कोरोनाच्या काळात गतिमान आरोग्य यंत्रणा राबविल्याबदल सभागृहाने अभिनंदनाचा ठराव मांडला. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागातून थोपविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. डॉ.शिंदे यांच्या अभिनंदनाच्या ठरावाने आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा बुधवार दि.23 रोजी झाली. यावेळी आरोग्य विभागाचा आढावा देण्यासाठी डॉ.बालाजी शिंदे उभा राहिले असता, वाजेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य मनोहर शिंदे म्हणाले,की दुसऱ्या लाटेने शहरी सह ग्रामीण भागातील जनता हैराण झाली असताना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नागरिकांना उपचार देण्यात आले.लसीकरण अभियान ग्रामीण भागात कुठे कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पाडले जात आहे. या सगळ्या बाबीचा विचार करता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणेला विश्वासात घेऊन बळकट केले.त्यामुळे ग्रामीण भागातील दुसरी लाट रोखण्यात मदत झाल्याची भावना शिंदे यांनी अभिनंदन ठराव मांडताना व्यक्त केली.

यावर अनुमोदक म्हणून बोलताना जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे म्हणाले,की डॉ.शिंदे यांनी टीम लीडर म्हणून बजावलेली भूमिका कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करत ते नक्कीच अभिनंदनास पात्र असल्याचे सांगत या ठरवास अनुमोदन असल्याचे सभागृहास कळविले.याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर, समाधान जाधव,प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सुद्धा शिंदे यांचे अभिनंदन केले.

डॉ.बालाजी शिंदे यांनी पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही ग्रामीण भागातील प्राथमिक केंद्र व उपकेंद्र अंतर्गत आरोग्य अधिकारी,परिचारिका असो, की अन्य आरोग्य कर्मचारी यांच्याशी समनव्य राखत तसेच आरोग्य केंद्राला भेटी देत औषधी,सॅनिटाझर पुरवठा केला.त्यामुळे शेकडो बाधित रुग्णास उपचारास मदत झाली.तसेच कोरोना तपासणी आणि लसीकरण कार्यात आरोग्य विभागाने घेतलेली आघाडी, जिल्ह्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरली आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago