देगलूर,बातमी24:-आरक्षण आणि राज्य घटना विरोधी अजेंडा राबविणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष निवडणुकीत मदत करण्याची वंचितची भूमिका संशयास्पद असून हा छुपा करार असल्याने आंबेडकरी समाजाने जागरूक राहून मतदान करावे, त्यामुुळे वंचीतला मतदान दिले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो. हा पूर्व अनुभव विचारात घेऊन काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना मतदान करावे असे आवाहन पी आर पी चे राज्य महासचिव बापूराव गजभारे यांनी देगलूर तालुक्यातील करडखेड ,बल्लूर, होट्टल येथील प्रचार सभेत बोलताना केले.
ते पुढे म्हणाले कि बलाढये असलेल्या कांग्रेस,भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना विविध पक्षा सोबत युती करावी लागते तिथे एका जातीत असंख्य संघटना असलेल्या आंबेडकरी मताच्या ताकदीवर वंचित काय साध्य करणार असा सवाल उपस्थित करून गजभारे म्हणाले कि,बाळासाहेब आंबेडकरां बद्दल आपल्याला खूप आदर आहे पण त्यांनी समाजाला सत्ता मिळवून देणारा मार्ग दाखवावा एमआयएम सोबतची युती लोकसभा निवडणूक झाल्या नंतर त्यांनी तीन महिन्यातच तोडली तिथेच वंचितचे राजकीय अस्तित्व संपले आहे
.त्यांनी दिलेले उमेदवार यांना विविध पक्षात मानाचे स्थान मिळाले,पण समाजाला आणि कार्यकर्त्यांना काय मिळाले केवळ भाजप सारख्या संविधान विरोधी पक्षाची राजकिय शक्ती वाढली त्याचे दुष्परिणाम विविध घटकांना सोसावे लागत आहेत.
आंबेडकरी समाजाने या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करून जितेश अंतापूरकर यांना विजयी करावे व अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मजबूत करावे असे आव्हान गजभारे यांनी केले त्यांचे त्यांचे समवेत पीआरपीचे विधानसभा अध्यक्ष सतीश पांडवे आणि इतर पदाधिकारी प्रचार कार्याला लागले आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…