Categories: नांदेड

जि. प. सीईओ पदासाठी ठाकुर, टाकसाळे अन् गोयल यांचे नाव चर्चेत

जयपाल वाघमारे

नांदेड,बातमी24ः- मागच्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. या पदासाठी सर्वाधिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वर्षा ठाकुर, उपायुक्त शिवानंद टाकसाळे व किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे नाव आघाडीवर आहेत. मात्र यात सर्वाधिक आघाडीवर सौ. ठाकुर व श्री. टाकसाळे यांचे नावे चर्चेत आहेत.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे हे सार्थी येथे संचालक म्हणून बदलीने मार्च महिन्यात बदली झाली. तेव्हापासून मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे रिक्त असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कारभार आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या कारभाराबाबत तक्रारी वाढत असल्याने रिक्तपदावर अधिकारी बसविण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत.

मंत्रालयास्तरावरून नांदेड जिल्हा परिषद सीईओ पदासाठी थेट आयएएस अधिकारी येण्यास फ ारस कुणी उत्सुक नसले, तरी मराठवाडयात काम करत असलेल्या अधिकार्‍यांमधून चार ते पाच नावे पुढे येत असली, तरी यातील दोन नावे मागे पडली आहेत.यामध्ये अनिल रामोड व दिलीप स्वामी यांचे नावे सुरुवातीला चर्चेत होते. परंतु हे दोन्ही नावे स्पर्धेतून कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.

या स्पर्धेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात रोजगार हमी योजना उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वर्षा ठाकुर घुगे यांचे नाव पुढे येत आहे. त्याचसोबत याच कार्यालयात अपर आयुक्त असलेले शिवानंद टाकसाळे व किनवट येथे सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेले थेट आयएएस अधिकारी अभिनव गोयल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
——
अशोक चव्हाण यांची भूमिका महत्वाची
नांदेड जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोण आले पाहिजे, यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे कोणाच्या नावाला हिरवाकंदिल देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चव्हाण सांगितल तेच नाव अंतिम होणार आहे. मात्र नवा सीईओ कधी येणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago