Categories: नांदेड

डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव; अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतील अभियान

नांदेड, बातमी24:- कर्करोगासंदर्भात ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली, असून मोहिमेला देशपातळीवरील डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला आहे. हे अभियान राबवण्यिासाठी तत्कालीन जिल्हाहिधकारी अरूण डोंगरे यांनी परिश्रम घेत हे अभियान गावा-गावात पोहचविले होते.

कर्करोग आजारासंदर्भात लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहिम हाती घेतली होती. जिल्ह्यातील बाराशे खेड्यांमध्ये 1 हजार 500 आशा कार्यकर्ती यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयातील 25 लाख लोकांना स्क्रीनिंगच्या कार्यकक्षेत घेता आले.

या जनजागृती अभियानामुळे 12 हजार लोकांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून आले. अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकले. त्यामुळे असे रुग्ण हे कोरोनातून मुक्त किंवा उपचारामुळे आजाराविरुद्ध लढा देत आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ही मोहिम राबविली गेली.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण जिल्हाभर राबविल्या गेलेल्या या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवर गुड गव्हर्नन्ससाठी मान्यता प्राप्त असलेल्या स्कोच अर्वाडसाठी नामांकन दाखल केले होते. यानंतर सदर संस्थेने अखिल भारतीय पातळीवरील नवीन दिल्ली येथे या वर्षाच्या जानेवारी महिन्यात एक मोठी परिषद घेऊन प्रत्येक नामांकन सादर करणार्‍या जिल्हा प्रमुखांना सादरीकरण करण्यास सांगितले होते.

यात नांदेड जिल्ह्याचे सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी करुन संपूर्ण जिल्ह्याचा सप्रमाण आराखडा ठेवला होता. नांदेड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या माहितीने देशभरातील तज्ज्ञ भारावून गेले हेाते. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला अखिल भारतीय पातळीवरील हा डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव केला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago