Categories: नांदेड

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

नांदेड, बातमी24ः-हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त आणि नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल वाघी तालुका नांदेड येथे आज इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना वह्या, मास, पेनचे वाटप करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, बबनरावजी वाघमारे,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर इंगळे, सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी धनगे यांनी वाघी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. या कोरोना विषाणूमुळे शिक्षणाचे फार मोठे नुकसान होत आहे हे कधीही भरून निघणार नाही, अशी खंत व्यक्त केली. मुख्याध्यापक बादशा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन प्रलोभन कुलकर्णी यांनी केले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago