जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः-जिल्हा परिषदेची पहिली ऑनलाईन सर्वसाधारण सभा सोमवार दि. 15 जून रोजी होणार असून या सभेकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे. ऑनलाईन सभेवरून काही सदस्यांनी आक्षेप नोंदवित सभा ऑफ लाईन घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु प्रशासनाने धुडकावून लावली.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संसर्ग पसरू नये, यासाठी शाररीक अंतर राखण्यासाठी ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यासंबंधी प्रशासनाने शक्कल लढविली. तशी गळी उतरविण्याचे काम ही प्रशासनाने केले. त्यामुळे उद्या होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन सभा घेण्यात पदाधिकार्यांपेक्षा अधिकार्यांच्या हिताचे ठरणार असून मागच्या तीन महिन्यांच्या काळात झालेल्या अनेक अनियमितांना पांघरून घालणे शक्य होणार आहे.
प्रत्यक्षात सभा झाली असती, तर पदाधिकार्यांसह प्रशासनाचे अनेक बाबींवर उठे काढण्याची संधी सदस्यांना असती, परंतु ऑनलाईन सभेवर येणार्या मर्यादा पाहता सदरची सभा गुंडाळण्यावर पदाधिकार्यांसह प्रशासनाचा भर असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन सभेच्या यशापेक्षा सदस्यांकडून होणारी कपडेफ ाड मोहीम थांबणार यात काही अधिकारी व पदाधिकारी स्वतःला धन्य मानू शकतात.
ऑनलाईन सभेला भाजपचे माणिकराव लोहगावे, पुनम पवार यांच्यासह काही सदस्यांनी विरोध दर्शविला असला, तरी त्यांचा विरोध जुमानून लावत सभा ऑनलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. या सभेला कितपत प्रतिसाद मिळू शकतो, हे प्रत्यक्षात सभा सुरु झाल्यानंतरच समजू शकणार आहे. सदस्यांना या तंत्राशी स्वतःला जोडून न घेता आल्यास सभा प्रत्यक्षात ऑफ लाईन घ्यावी लागू शकते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…