नांदेड,बातमी24: ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरतांना दिसून येत आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी मंगळवार दि.2 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक-मालक व पेट्रोल कंपनी चालकांची बैठक घेतली.यामध्ये जिल्ह्यात आठ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक असून तूर्त काळजी न करण्याचे कारण असल्याचा विश्वास देण्यात आला आहे.त्यामुळे लागलीच तुटवडा निर्माण होईल अशी परिस्थिती नसून आवश्यक लागेल तितकेच डिझेल व पेट्रोल भरून घ्यावे, अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन राऊत यांनी केले.
यावेळी जनतेला उद्देशून राऊत यांनी एक व्हिडिओ सादर केला, असून यामध्ये ते म्हणाले, की सर्व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेएवढेच नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टिने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…