नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र निर्बंध कडक करण्यात आले आहेत.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार दि.8 रोजी घेण्यात आली.मात्र ऑनलाईन बैठकीत तांत्रिक कारणास्तव संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पुन्हा होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
जिल्हा नियोजन समिती बैठक नियोजन भवन येथे झाली.यावेळी ही बैठक ऑनलाईन झाल्याने समिती सदस्य या बैठकीस आपल्या सोयीच्या ठिकाणावरून अप्रत्यक्ष सहभागी झाले तर अधिकारी मंडळी व काही आमदार हे प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विस्तृत आढावा घेत ला.मात्र समिती सदस्यांना या बैठकीत संवाद साधताना अडचणीचा सामना करावा लागला.
जिल्हा नियोजन समिती बैठकीत सर्वांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक पुढील पंधरा दिवसांच्या काळात ऑफलाईन बैठकीचे नियोजन केले जाणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
—–
टाळेबंदी नसून निर्बंध कडक होतील:-चव्हाण
कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे. याबाबत टाळेबंधी करण्याची तूर्त तरी आवश्यकता नाही.मात्र सर्व नागरिकांनी मास्क,गर्दी टाळणे व हात वारंवार धूत राहणे याचसोबत 15 वर्षावरील सर्वांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…