नांदेड

रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवडयास औषधी प्रशासन जबाबदार; इंजेक्शनच्या काळया बाजारावर शिक्कामोर्तब

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे हहकार माजविला, असून नांदेड जिल्ह्यातील रोजची आकडेवारी हजारीपार झाली आहे. तर मृत्यूची होणारांची संख्या पंचविसीच्या पुढे सरकली आहे. अनेक रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेकांना जिवाशी मुकावे लागत आहे. त्यातली-त्यात तुटवडया आडून या इंजेक्शनचा होणारा काळाबाजार हा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.यास औषधी प्रशासनाची मुकसंमती साठेबाजीला उत्तेजन देणारी ठरत आहे.

कोरोनाची दुसरी लाट मराठवाडयात औरंगाबाद व त्यानंतर नांदेडमध्ये स्फ ोट करणारी ठरली आहे. मागच्या वर्षेभरांमध्ये जितके रुग्ण मरण पावले नव्हते. तितके रुग्ण हे मागच्या महिनाभराच्या काळात दगावले आहेत. त्याचसोबत रुग्णांचा आकडेवारी सुद्धा त्याच गतीने वाढत आहे. नांदेड महापालिका हद्दीत पाचशे तर जिल्हाभरात पाचशे पेक्षा जास्त असे एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नित्याने होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे.

वाढती संख्या नियंत्रणात येत नसल्याने प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे.लॉकडाऊन सारखा प्रयोग ही फ ारसा उपयोगी ठरत नसल्याचे बघायला मिळत आहे. दुसरीकडे व्यापार्‍यांमधून मोठी नाराजी वाढत चालली आहे. सरकारीसह सर्व खासगी रुग्णालये हाऊसफु ल झाले, असून आजघडिला बेड मिळणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे मृत्यूदर रोखण्याचे यातून आव्हान निर्माण झालेले आहे.

यात सगळयात मोठी अडचन निर्माण झालेली आहे. ती म्हणजे, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा होय. नांदेडमध्ये रोजची मागणी दोन ते अडीच हजारांची आहे. मात्र प्रत्यक्षात हजार ते दीड हजार इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. तुटवडा होत असल्याने औषधी दुकानदार व त्यातील साठेबाजी करणारांचे चांगलेच फ ावत आहे. मुळ किंमतीच्या चार पट दराने इंजेक्शन विकले जात आहे. याकडे औषधी प्रशासनाने तिळमात्र लक्ष दिले नाही. लोकांमधून ओरड होत असली, तरी याकडे औषधी प्रशासनचे सहाय्यक आयुक्त राठोड यांनी कानाडोळा केला.

रेमडेसीवीर मिळणे अवघड झाले, असताना चढया दराने बाजारात विकले जात असल्याने लोकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला. यावर जिल्हाधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी  आवाज उठविल्यानंतर कुंभकर्णी औषधी प्रशासन जागे झाले. त्यानंतर समिती गठीत करण्याचे सोंग केले. इंजेक्शनची झालेली साठेबाजीबाबत औषध प्रशासना माहित नसावे ते नवलच म्हणावे लागेल. त्यास सहाय्यक आयुक्त राठोड व त्यांच्या टीमचे झालेले काळे हात कारणीभूत ठरतात.

साठेबाजीबाबत जनतेमधून ओरड झाल्यानंतर चार जणांवर कारवाई केली. त्यापूर्वीच औषधी प्रशासन कारवाई करू शकले असते. मात्र टाळूवरचे लोणी खायचे कुणी, अशा गिधाड वृत्तीचे अधिकारी प्रशासनात बसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला, हे सुद्धा दुर्लक्ष करून चालणारे नाही. याबाबत सरकारने दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. अन्न औषधी प्रशासन आयुक्त हे साठा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्यांचेच अधिकारी जिल्हा पातळीवर साठेबाजीला बळ देऊन शेण खाण्याचे काम करत असल्याची ओरड सामान्य नागरिकांमधून होत आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago