नांदेड, बातमी24:-मराठवाडयात नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या चिंता वाढविणारी होती.मात्र मागच्या दहा दिवसांपासून रुग्णसंख्येत कमालीची घट होत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येस अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दि.25 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान लावलेले लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. यासाठी स्वतः डॉ.इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी रस्त्यावर उतरून केलेले आवाहन फलदायी ठरले.
आजघडीला मराठावाड्यात रुग्ण संख्या वाढत आहे.यात बीड जिल्हा असो की इतर अन्य जिल्ह्यात वाढता रुग्णसंख्येचा वेग सतवणारा ठरत आहे. तशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यात काही दिवसापूर्वी होती.रुग्णसंख्या आठराशे पर्यंत गेली होती.मात्र मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या कमी होत असल्याचे बघायला मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी दि.25 मार्च ते 5 एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात टाळेबंदी केली होती. घराबाहेर पडणारे लोंढेच्या लोंढे कमी झाले.काळजी घेणे हा एकमेव पर्याय असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली,त्यानंतर राज्य सरकारने 14 एप्रिलपासून सुरू केलेले लॉकडाउन आता 15 मे पर्यंत वाढविले आहे. लोकांनी मी जबाबदार याची जाणीव ठेवली तर पंधरा मे पर्यंत रुगसंख्या शभरीच्या आत येऊ शकते, शिवाय मृत्यू दर ही एक अंकी संख्येत मोडला जाऊ शकतो.
——
नागरिकांनी अधिक सजग व्हावे:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर
कोरोनाची दुसरी लाट मोठी हानी पोहचविणारी ठरली आहे. यात रुग्णसंख्या झपाट्याने काढली.यात काहींचा मृत्यू सुद्धा ओढवला.रुग्णसंख्या घटत आहे, ही दिलासा देणारी बाब असली, तरी नागरिकांनी मास्क लावणे,सॅनिटीझर करणे व अंतर पाळणे या बाबीकडे लक्ष दिले तर आपण कोरोनाच्या संकटाला सहजपणे सामोरे जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…