नांदेड, बातमी24 :- दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा, अभ्यासासोबत त्यांच्यातील इतर कला गुण जोपासले जावेत यासाठी दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांनी सर्वसामान्यांसारखे आपण सर्व गोष्टी करु शकतो हा आत्मविश्वास बाळगून या स्पर्धेत उतरावे व येथून एक नवी आठवण घेवून जावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा-2024 पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे आदी अधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आजच्या घडीला दिव्यांगांनी प्रत्येक क्षेत्रात आपली नवी ओळख बनविलेली आहे. समाज कल्याण विभागाने मागील काही दिवसात दिव्यांगांची मतदार नोंदणी व जागृती केली. दिव्यांगाना मतदान करण्यासाठी आता मतदान केंद्रावर जाण्याची गरज नसून घरी बसल्या-बसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शासकीय विभागांनी दिव्यांगाना अनेक उपक्रमात सेवा-सुविधा पुरविण्यात पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
दिव्यांगामध्ये एक अलौकिक, दिव्य शक्तीचा समावेश असतो. त्या अलौकिक शक्तीचा वापर करुन या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे प्रोत्साहनपर आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना केले. तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने शुभेच्छा दिल्या. यावेळी 50 मीटर कुबडीवर चालणाऱ्या दिव्यांगांच्या धावण्याच्या स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते अद्भूत असे पथसंचलन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील मुकबधीर 156 विद्यार्थी, अस्थिव्यंग 220, अंध 145, मतिमंद 90 असे एकूण 611 दिव्यांग विर्द्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत मुकबधिर विद्यार्थी 50 व 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक आणि मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वाप्ट बॉल थ्रो, गोळा फेक, लांब उडी, पळत येवून लांब उडी, 50, 100, 200 मीटर धावण्याची स्पर्धा होणार आहेत. तसेच अस्थिव्यंग साठी 50, 100, 200 मीटर धावणे, पोहणे, व्हिल चेअर रेष, कुबडीवर चालणे, सरपटत चालणे, बास्केट मध्ये बॉल टाकणे इत्यादी स्पर्धा घेण्यात येत आहेत.अंध विद्यार्थ्यांसाठी बुध्दीबळ, धावणे, 50, 100, 200 मीटर धावणे, गोळा फेक, पासिंग द बॉल इत्यादी स्पर्धा घेण्यात येत आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. तर सुत्रसंचलन मुरलीधर गोडबोले यांनी केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…