नांदेड, बातमी24: जिल्हा परिषदेच्या वार्षिक बदल्यांची प्रक्रियेस 20 मे पासून सुरुवात होणार असून बदलाच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांकडून राजकीय हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न केला जात असतो,या पुढे कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप घडवून आणल्याची बाब समोर आल्यास अशा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिला.
जिल्हा परिषद अंर्गतग बांधकाम,लघु पाटबंधारे,ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण,कृषी,सामान्य प्रशासन विभाग,आरोग्य,शिक्षण,ग्रामपंचायत,पशुसंवर्धन व वित्त विभागाच्या बदल्यांची सुरुवात दि.20 मे ते 26 मेपर्यंत चालणार आहे.
वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक वर्षी बदल्या होत असतात,यात कर्मचारी मंडळी स्वतःची सोय साधण्यासाठी राजकीय नेतेमंडलीना ढाल म्हणून वापर करत असतात.त्यानुसार नियमांना फाटा देण्यासाठी राजकीय मंडळींना हाताशी धरून प्रशासनाला अडचणीत आणण्याचा डाव साधला जातो.परिणामी न्यायालय तसेच विभागीय आयुक्त कार्यलयात कागद काळे करत बसत उत्तरावर उत्तरे देत बसावी लागत असत.
या सगळ्या बाबीचा विचार करता,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नोटीसपत्र काढत, कर्मचाऱ्याचा बदल्या,पदोन्नती व समायोजन हे नियमाप्रमाणे होत असते.त्यामुळे शिफारस राजकीय हस्तक्षेप करू नये,अशी ताकीद ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना दिली.नियमाचा भंग केल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…