नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार नसले, तरी रस्त्यावरचे नियम मात्र कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून लोकांना अधिक काळजीपोटी शिस्त पाळावी लागणार आहे.
लॉकडाऊन वाढणार अशी चर्चा दोन दिवस सुरु होती. या चर्चेवर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना यासंबंधी तीनवेळोवेळी खुलासा करावा लागला आहे. परिणामी लॉकडाऊनचा विषय पुढील काळात पुढे येईल, किंवा नाही हे सांगता येणार नसले, तरी आजघडिला कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाबद्दल काळजी घेणे सगळयांच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेले निर्देश, आदेश व सूचनांचे शंभर टक्के पालन झाले पाहिजे, यासाठी जिल्हास्तर, तालुका व ग्रामपंचायत पातळीवर अधिकार्यांचे देखरेख पथकाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याममध्ये तालुकास्तरावर मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी. नगरपालिका हद्दीत उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी,तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच ग्रामपंचायतस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलिस व कृषी अधिकार्यांवर जबाबदारी असणार आहे.
——
पुढीलप्रमाणे असणार आहेत नियम
दुचाकीवर एकच व्यक्तीस परवानगी असणार आहे. डब्बलसीट बसल्यास पाचशे रुपये दंड, तीन चाकी वाहनांमध्ये चालक व दोन प्रवासी परवानगी देण्यात आली आहे, गाडीत अधिकचे प्रवासी बसविल्यास एक हजार रुपये दंड, चार चाकी वाहनांमध्ये एक +दोन प्रवासी इतकीच पवानगी असणार आहे. यापेक्षा जास्त असल्यास एक हजार रुपये दंड लागू शकतो.
तोंडावर मास्क न लावणे, शाररिक अंतर न राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुकणे हे सुद्धा लोकांना महागात पडणार असून एक हजार रुपये दंड लागणार याशिवाय दुकानांमध्ये नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्यास पाच हजार रुपये दंड अशा नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.
——
चौकट
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाइी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोनाविरोधातील लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. इटनकर यांनी केले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…