नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे एका जिल्हा परिषद महिलेचे निधन नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाल्याची घटना बुधवार दि.02 सप्टेंबर रोजी घडली.जिल्हा परिषदचे माजी सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांच्या त्या मातोश्री होत.
किनवट तालुक्यातील बोधडी गटा च्या सदस्या श्रीमती सुनंदा ओमप्रकाश दहिफळे यांना त्रास होऊ लागल्याने नांदेड येथील आशा हॉस्पिटल येथे दि.15 आगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. सुरूवातीला निमोनियाचा आजार उद्भवला होता.त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यानच्या काळात त्रास अधिक जाणवू लागल्याने कृत्रिम श्वसश्वास लावण्यात आला होता.परंतु उपचारास प्रतिसाद न मिळू शकल्याने बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी दुपारी दोन 2 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणजोत मावळली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांच्या त्या मातोश्री होत.
——–
यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले काँग्रेसचे लोहा तालुक्याचे नेते उद्धवराव कवडगावकर यांचे सुद्धा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…