नांदेड,बातमी24;- गतवर्षी नांदेड येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची गोल्डन बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या कार्य अहवाल जि.प.सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या योग स्मरणिकेचे विमोचन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.
या स्मरणिकेचे संपादक स्वामी आनंददेव महाराज यांनी मांडणी केली आहे. स्मरणिकेचे मुखपृष्ठ व विशेष सहाय्य सौ. प्रणिता देवरे चिखलीकर यांचे लाभले आहे. स्मरणीकेतील फोटो संकलन अखिलखान यांनी केले असून केंद्रीय सल्लागार सचिन यांचेही मोलाचे मार्गदर्शन झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गुरुवार दि.17 जून 2020 रोजी नांदेड आंतरराष्ट्रीय योगदिन स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, जि.प.सदस्या प्रणिता देवरे चिखलीकर, युवा भारतचे राज्य प्रभारी अभय काबरा, राज्य कार्यकारणी सदस्य राम पटेल यादव, वरिष्ठ योग शिक्षिका जयश्री देसाई, कृष्णा पापीनवार आदीची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…