Categories: नांदेड

शेतकऱ्यांनी न खचून जाता आधुनिकतेची सांगड घालत शेती करावी:-जि.प.अध्यक्ष अंबुलगेकर

नांदेड,बातमी24:-शेती ही निसर्गावर अवलंबून असल्‍यामुळे शेतक-यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता संघर्ष करावा. आत्‍महत्‍या करणे हा पर्याय नसून शेतक-यांनी नव्‍या उमेदीने शेतीकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. शेतक-यांनी धावणारे पाणी आडवावे व अडवलेले पाणी जमिनीत मुरवून शेती फुलवावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज गुरुवार दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी आर.एस. कार्तिकेयन, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, समाज कल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, माजी सभापती माधवराव मिसाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवशंकर चलवदे, कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव, भीमराव कल्याणे, मारोतराव लोखंडे, प्रा.डॉ. पंडागळे, प्रा.डॉ. देविकांत देशमुख, सचिन घाडगे आदींची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, खरीप हंगामाच्या नियोजनासाठी जिल्हयाचे पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. पिक कर्ज, पिक विमा आदींसाठी कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. जिल्‍हयातील शेतक-यांना खताची कमतरता पडणार नाही यासाठी प्रशासन सज्‍ज आहे. कोराना कालावधीत अनेक जण वर्क फ्रॉम होम केले. परंतु शेतकऱ्यांना असा पर्याय नव्हता. त्यांना प्रत्‍यक्ष शेतात जाऊनच या काळात काम करावे लागले. त्‍यामुळे आपल्‍याला वेळेवर अन्‍न मिळाले आहे. आज अनेक शेतकऱ्यांनी उत्कृष्ट पिके घेऊन, नावीन्यपूर्ण शेती केल्‍यामुळेच त्‍यांना आज पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात येत आहे. यात महिला शेतकरी देखील मागे नाहीत याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असेही त्‍या म्‍हणाल्‍या. अशाच पद्धतीने इतर शेतकऱ्यांनी देखील शेती करुन उत्पादनात वाढ करण्‍याचे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले.

प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्‍य शासनाच्या कृषि विभागाच्‍या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांनी 49 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले. याप्रसंगी समाज कल्याण सभापती रामराव नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, प्रा. डॉ. पंडागळे, प्रा. डॉ. देवीकांत देशमुख, सचिन घाडगे, आदींची भाषणे झाली. यावेळी पुरस्‍कार प्राप्‍त शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कवडे तर उपस्थितांचे आभार गजानन हुड्डेकर यांनी मानले. यावेळी कृषी विभागातील कृषी अधिकारी यांना त्यांच्या कामकाजासाठी लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्‍या वतीने शेतक-यांसाठी काढण्‍यात आलेल्‍या भित्‍तीपत्रकाचे विमोचन व दैनिक पुढारीने काढलेल्‍या कृषि विशेष पुरवणीचे प्रकाशन यावेळी करण्‍यात आले. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, जिल्‍हयातील शेतकरी यांनी उपस्थिती होती.

*चौकट*
*बळीराजाच्या पाठीशी प्रशासन – वर्षा ठाकूर-घुगे*

कृषी क्षेत्राच्‍या माध्‍यमातून जिल्ह्याचा विकास अवलंबून असतो. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून बळीराजाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन बळीराजाच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. पारंपरिक शेतीबरोबरच शेतक-यांनी नव तंत्रज्ञानाची जोड द्यावी. नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्याची दखल घेतली जाणार आहे. पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. या वर्षात जिल्‍हयातील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. आपला उत्‍पादित माल विकण्‍यासाठी ई-तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असेही त्या म्हणाल्या.

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago