नांदेड

योगेश बावणे यांचा बेटमोगरेकर यांच्याकडून हृदयी सत्कार

नांदेड, बातमी24ः युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाला नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील योगेश बावणे यांनी यश संपादन केले. यानिमित्ताने योगेश बावणे यांचा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर यांच्या दालनात जिल्हा परिषदेच माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी हृदयी सत्कार करून योगेश बावणे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद शिक्षक अशोब बावणे यांचे सुपुत्र असलेल्या योगेश बावणे यांचा जिल्हा परिषदमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिला व बालकल्याण सभापतींच्या दालनामध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिक्षण सभापती संजय बेळगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश पावडे, पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रकल्प संचालक व्ही. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगोले, कार्यकारी अभियंता रायबोळे, बंडु आमदुरकर, अशोक बावणे, मधुकर उन्हाळे, संजय कोठाळे, भागवत पाटील आदींची उपस्थिती होती.

दिलीप पाटील बेटमोगरेकर म्हणाले, की जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी युपीएससीच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव रोषण करण्याचे काम केले आहे. अशा अधिकार्‍यांकडून देशाचे व प्रशासनाचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार काढले

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago