नांदेड,बातमी:- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहून अनेकांची घाबरगुंडी होत आहे.तर धैर्याने कोरोनाचे रुग्ण लढा देत कोरोनामुक्त ही होत आहेत. ज्या वृद्ध लोकांबाबत कोरोनाचा धोका अधिक संभविला जातो,अशा एका 65 वर्षीय महिलेने तब्बल 26 दिवस कोरोना झुंज देत स्वतःला कोरोनामुक्त केले. या आजीच्या हिंमत व धैर्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
गाडीपुरा येथील एका 65 वर्षीय महिलेस अनियंत्रित मधुमेह व उच्च रक्तदाब आजार यात कोरोनाची लागण झाली.त्रास जाणवू लागल्याने 19 मे रोजी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणीनंतर फुसफूसात गंभीर स्वरूपाचा निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले.श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम श्वाव यंत्रणा लावण्यात आली होती.
वैधकीय अधिकारी डॉ.भुरके, डॉ.शीतल राठोड,डॉ.उबेदुल्लाखान व डॉ.कपिल मोरे यांच्या पथकाने या रुग्णावर। लक्ष केंद्रीय करून कोरोनाच्या संसर्गातून मुक्त केले.
या वृद्ध आजीने उपचारास प्रतिसाद दिल्याने कोरोनावर मात करता आली,असल्याचे वैधकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे सोमवार दि.15 जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…