नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या बदल्या रद्द करण्यात आले. बदल्या करू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारीच प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी यांना सूचित केले होते. तसेच कर्मचारी संघटना, विभाग प्रमुख व काही पदाधिकार्यांनी बदल्या करण्यास विरोध दर्शविल्याने प्रशासनास दबावापोटी निर्णय घेणे भाग पडल्याचे बोलले जात आहे. मात्र बदल्या निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी, काही पदाधिकारी व सदस्यांमधून स्वागत होत आहे.
जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे.नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने नाकीदम आणला आहे. प्रशासनाला उपाययोजना करताना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे लोण पसरले, असून जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर मोठा ताण येत असताना अशा काळात जिल्हापरिषदेच्या बदल्या करणे म्हणजे मोठी आपत्ती अंगावर ओढवून घेण्यासारखे होते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बदल्या करू नयेत, असे स्पष्टपणे जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांना सांगितले होते.
यासंबंधी शनिवारी डॉ. कुलकर्णी यांनी पदाधिकारी व अधिकार्यांचे मत ग्राहय धरत सर्व विभागाच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रका म्हटले, की नांदेड शहर व ग्रामीण भागात कोविड-19 या वाढत्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बदल्यांच्या वेळी जिल्हा परिषद मुख्यालय येथे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थितीत राहणार आहेत.ही बाब विचारात घेता, सन 2020 च्या सार्वत्रिक बदल्या रद्द करण्याचा निर्णय सर्व सहमतीने घेतला असल्याचे कळविले. या प्रसिद्धीपत्रकावर मुख्य कार्यकारी अधिकार्यांची स्वाक्षरी आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…