दरोड्याच्या प्रयत्नातील चार जण ताब्यात; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

नांदेड

नांदेड,बातमी24:-नागपूर-लातूर महामार्गाच्या बाजूस काही संशयित आरोपी दबा धरून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळावी,यावरून मारलेल्या धाडीत चार जणांना ताब्यात घेण्यात आले,तर चार जण अंधाराचा लाभ उठवून पळून गेले.या कारवाईत 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले,की दि.18 ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टापते चौक परिसरातील मुख्य रस्ता लगत काही जण थांबले,असून त्यांच्याकडे खंजर,तलवार व इतर साहित्य आहे, सदरे सर्व इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळावी,यावरून तिथे मारलेल्या धाडीत चार जणांना ताब्यात घेण्यात आले,तर इतर चार जण अंधाराचा लाभ उठवित पळून जाण्याचा यशस्वी ठरले.

यात पकडलेले आरोपीमध्ये राजेंद्र छगन काळे (वय.48.रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद),संजय उर्फ पिल्या पिता राजेंद्र काळे (वय.25रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद),नितीन भारत डिकले (वय.28 रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद),प्रदीप बाळासो चौधरी (वय.27रा.उरलीकावण ता.हवेली जिल्हा पुणे),तर इतर जे चार जण फरार झाले.त्याची नावे पुढीलप्रमाणे आहे.यामध्ये रवींद्र बप्पा काळे (रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद),शंकर सुरेश काळे (वय.25रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद),अनिल रमेश शिंदे (वय.25रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद),अरुण बबन शिंदे (वय.25रा.मस्सा ता.कळंब जिल्हा उस्मानाबाद), यांचा समावेश आहे.
पकडलेल्या आरोपीकडून खंजर, तलवार,हातोडी,सबल, टॉमी,लोखंडी रॉड,दोर,मिरची पूड,मोबाईल व दोन चार चाकी गाडी असा 13 लाख 33 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग माने,फौजदार घेवारे, डी. एन.काळे,सुरेश घुगे,मारोती तेलंग,विठ्ठल शेळके,तानाजी येळगे, मारोती पवार,बालाजी यादगीरवाड, हेमंत बिचकेवार, शेख कलिम यांच्या पथकाने केली.