Categories: नांदेड

स्वीकृत नगरसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

कुंडलवाडी, बातमी24ः- नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्यपद मिळविण्यासाठी एका नगरसेवकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळविल्याच्या कारणावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

स्वीकृत सदस्य पंढरी लिंगन्ना पुपलवार यांनी दि.19 जानेवारी 2018 रोजी स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीवेळी नागपूर येथील विश्वभुषण बहुउद्देशीय युवक कल्याण सेवा व सांस्कृतिक संस्था भगवाननगर यांचे सहसचिव म्हणून बनावट दस्तावेज सादर करून घेतले होते.याप्रकरणी भाजपचे नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी सेवाभावी संस्थेचे धर्मादाय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्याकडून प्रमाणित प्रती हस्तगत केत्या होत्या

याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक सुरेश कोंडावार यांनी लेखी तक्रार दिल्यावरून आरोपी पंढरी लिंगन्ना पुपलवार याच्याविरुद्ध दि.4 जुलै रोजी गु.र.नं.83/2020,कलम 420,467,468,471 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि.सुरेश मांटे हे करीत आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago