नांदेड

शासनाच्या योजना दारोदारी पोहचवा:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24- अधिकारी कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी करतांना समन्‍वयाने कामे करावीत. लाभार्थ्‍यांना योजनेची परिपूर्ण माहिती होण्‍यासाठी गावस्‍तरावर बैठका घेवून लाभ द्यावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

आज सोमवार दिनांक 29 मे रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी परिविक्षाधिन आय.ए.एस. अधिकारी देवयानी यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मंजुषा कापसे, नारायण मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ बालाजी शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, गावस्‍तरावर शासकीय योजनांची प्रचार-प्रसिघ्‍दी करण्‍यासाठी, स्‍वयंसेवी संस्‍थेसह किर्तनकार, महाराज, मौलवी, भंते आदींचा सहभाग घेतल्‍यास कामाला गती मिळेल. यासाठी गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी व तालुकास्‍तरावरील यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत.

या समन्वय सभेमध्ये ग्रामपंचायत विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण घरकुल योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण, समाज कल्याण, आरोग्य, जलसंधारण, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास विभाग यासह महाराष्ट्र गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, हर घर नर्सरी, वित्त व सामान्य प्रशासन या विभागाचा सविस्तर आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला. या सभेला महिला बाल कल्‍याण विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, प्राथमिक विभागाच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रभारी कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, यांच्यासह खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.

चौकट

शासन आपल्‍या दारी अभियानाचा आढावा

लोककल्‍याणकारी योजना नागरीकांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी राज्‍य शासनाच्‍या वतीने सुरु असलेल्‍या शासन आपल्‍या दारी अभियानाचा यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनेत लोकसहभागाने अनेक गावांचा कायापालट केला आहे. आता शासन आपल्‍या दारी अभियानातून जास्‍तीत जास्‍त वैयक्तिक लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यासाठी अधिकारी व कर्मचा-यांचा विभाग निहाय आढावा घेतला. योजना निहाय लाभार्थ्‍यांच्‍या याद्या तयार करणे, यापूर्वी लाभ देण्‍यात आलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या, नव्‍याने लाभ देण्‍यात येणा-या लाभार्थ्‍यांची विभागनिहाय यादी, लाभाचे वाटप व नियोजन यासंदर्भात त्‍यांनी आढावा घेतला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago