नांदेड,बातमी24:- आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने चार नवीन बोटींची इतर अत्यावश्यक साधनांची खरेदी केली. या बोटींचे आज तांत्रिक समितीद्वारे तपासणी करुन या बोटींना जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी करून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या बोटींची पाहणी केली.
या चार बोटींपैकी दोन बोटी या नांदेड शहरासाठी तर एक बोट हदगाव तहसिल व एक बोट नायगाव तहसिलकडे सुपूर्द केली जाणार आहे. याचबरोबर या बोटीसमवेतच प्रत्येक तालुक्याला लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, सॉ कटर, रेस्क्यू रोप, मेगा फोन, फर्स्ट एड किट, फोल्डेबल स्ट्रेचर, टूल कीट इत्यादी शोध व बचाव साहीत्य दिले जाणर आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयातील दोन कर्मचारी याप्रमाणे बोट चालविण्याचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनर द्वारा दिले जाणार आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार नांदेड सारंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्निशमन अधिकारी रईस पाशा आदी उपस्थित होते
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…