Categories: नांदेड

हिमायतनगर तालुका;वीज पडून एक ठार

हिमायतनगर,बातमी24:- वीज कोसळून एका तरूण सालगड्याचा मृत्यू झाल्याची  घटना हिमायतनगर तालुक्यातील सरसम शिवारात रविवार (दि.14) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घडली. सुभाष दिगांबर गुंडेकर (वय ४५) असे मयत सालगड्याचे नाव आहे.
सालगडी सुभाष गुंडेकर हा शेतीकामं करण्यासाठी विजय देशमुख यांच्या शेतात गेला होता. रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरूवात झाली. दरम्यान आश्रयासाठी जवळच्या बाभळीच्या झाडाखाली बैलगाडीजवळ थांबला असता कडाडून वीज कोसळली. यातच सालगड्याचा जागीच मृत्यू झाल. या घटनेमुळे सरसम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयताच्या पश्चात्य पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. मयताच्या कुटूंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे
जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago