नांदेड

होट्टल महोत्सवातून मिळणार सांस्कृतिक मेजवानी;9 ते 11 एप्रिल  आयोजन;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- कोरोना नंतर दोन वर्षांनी होणारा तसेच सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या “ होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे ” आयोजन 9 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक झाली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व यंत्रणाना सकारात्मक सहभाग घेवून हा महोत्सव अधिक चांगला होण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या निर्देशानुसार बैठकीत विविध नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, देगलूरचे उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महोत्सवाच्या पुर्व तयारीबाबत आढावा घेवून विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या महोत्सवाला अधिकाधिक पर्यटक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती-रसिक मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
या तीन दिवशीय महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारासह राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनाही ऐकण्याची संधी मिळणार आहे. होट्टल येथील पर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन राज्याच्या पर्यटन विभागामार्फत केले जात आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago