नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.कोरोनाचा विळखा मोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी हॉटेल,परमीटरूम,धाबे,बेकरी,स्वीटमार्ट,चाट भांडार आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले.हे आदेश 31 मार्चपर्यंत असणार आहेत.
कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली,असून वेगाने रुगसंख्या वाढत आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी मिशन बिगीन अगेन या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी घोषित केली आहे.तरी रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे.
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन अधिक कडक भूमिका घेऊ लागले आहे.त्यातच एक भाग म्हणून हॉटेल,परमीटरूम,धाबे,बेकरी,स्वीटमार्ट,चाट भांडार आदी बंद ठेवले जाणार आहे,मात्र हॉटेलमधून पार्सल सुविधा दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी कळविले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…