नांदेड

पित्यासह दोन मुली वाचल्या तर आई गेली वाहून; सहस्त्रकुंड धबधबा येथील घटना

किनवट, बातमी24ः सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील चार जण वाहून गेले होते. यात दोन मुली व तिचे वडिल पाण्यातून बाहेर आले. मात्र महिला पाण्यात वाहून गेली. उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नाही. ही घटना शनिवार दि. 10 ऑक्टोंबर रोजी घडली.काही दिवसांपूर्वी एकाच घरातील पाच जणांनी या धबधब्यात जलसमाधी घेतल्याचे घटना घडली होती.

झारखंड राज्यातील संतोष कुमार हे यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये कलर्क या पदावर कार्यरत आहे. ते आज सहकुटुंब सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले असता, धबधब्याच्या वरील बाजूस पाय धुण्यासाठी नदीमध्ये गेले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने संतोष कुमार (पती) ममता कुमार (पत्नी) व दोन मुलीसह ते नदीमध्ये अडकले.

या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मुरली येथिल संतोष राठोड या तरूणाने शर्यतीचे प्रयत्न करत बाहेर काढत असताना ममता कुमार (वय. 40 वर्षे) पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना विदर्भातील उमरखेड मुरली साईट कडून घडली आहे. सहस्त्रकुंड धबधबा येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीसाना माहिती कळताच साळवे,राचेलवार, गंगुबाई नार्तावार यांनी विदर्भ साईटकडे जाऊन शोधाशोध घेतला. मात्र मृतदेह मिळून आला नाही.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago