नांदेड

जाती-जमातीच्या योजना अंमलबजावणी  बदल समिती अध्यक्षांकडून जिल्हाधिकारी-सीईओची प्रशंस

नांदेड,विशेष प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात या अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली.त्यामुळे सामान्य लाभार्थी यांना या योजनांचा लाभू मिळू शकला.या बदल अनुसूचित जाती-जमाती आयोग अध्यक्ष ज.मा. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची प्रशंसा केली.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गुरुवार दि.24 रोजी आल. यावेळी जिल्हा परिषदमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात अनुसूचित जाती-जमाती लाभार्थी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी समिती सदस्य
आर. डी. शिंदे (सेवा), सदस्य के. आर. मेढे (सामाजिक व आर्थिक), जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,सीईओ वर्षा ठाकूर,अतिरिक्त सीईओ डॉ.तुबाकले, समाजकल्याण सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांच्यासह जिल्हा परिषद विभागप्रमुखांची यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अभ्यंकर म्हणाले,की आजच्या आढावा बैठकीच्या निमिताने विविध योजना लाभार्थी यांना वाटप करण्याचा योग आला आहे, विविध योजना वाटपाची आकडेवारी पाहता,जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अनुसूचित जाती जमाती च्या लाभार्थी यांना न्याय मिळाला असून कृषीमध्ये बिरसा मुंडा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी योजनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडून आला. गावातील अल्पभूधारक लाभार्थी यांना शेळी गट पालन दिल्याने रोजगार मिळाला.आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनांमुळे जातीयता कमी होण्यास मदत होते,यातून गावा गावात सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीसाठी दिलेल्या लढाईचे आंतरजातीय विवाह प्रतीक असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले.

चौकट
या सगळ्या योजना जिल्ह्यात योग्य प्रकारे राबविल्या जात असल्याबद्दल अभंकर यांनी आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कार्याची जाहीररीत्या प्रशंसा केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago