नांदेड

उधाच्या लसीकरणबाबत डिएचओ डॉ.शिंदे यांची महत्वाची सूचना; नागरिकांनी लक्ष द्यावे

नांदेड,,बातमी24:- जिल्ह्यात लसीचा तुटवडा असला,तरी आवश्यकतेप्रमाणे नागरिकांना पहिला असो,की दुसरा तसेेच आठरा ते 45 वयोगट अशा पात्र लाभार्थी नागरिकांना उपलब्द्ध्धतेनुसार लस दिली जात आहे. गुरुवार दि.13 रोजी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे,त्यामुळे 45 वर्षांवरील किंवा 18 ते 45 आतील पहिला लस घेऊ इच्छुक नागरिकांनी केंद्रावर अनावश्यक गर्दी क रू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात 90 विविध शासकीय रुग्णालय अंतर्गत लसीकरण अभियान राबविले जात आहे. दि.11 मे पर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 78 हजार166 नागरिकांचे लसीकरण झाले आहेत.यामध्ये कोविल्ड शिल्ड व कॉव्हसीन या दोन्ही लसीचा समावेश आहे.मागच्या काही दिवसांपासून लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची विविध केंद्रावर गर्दी ओसंडत आहे.

कोरोना काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली असून वर्गवारीनुसार लसीबाबत नागरिकांना कळविले जात आहे.त्यानुसार गुरुवार दि.13 रोजी प्रत्येकी एका केंद्रावर 100 नागरिकांचे लसीकरण उपलब्ध होणार आहे. हे सर्व लस ही कोव्हीशिल्ड असणार आहेत,असे डॉ.शिंदे यांनी सांगितले.

यामध्ये श्री.गुरू गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय,डॉ.शंकरराव चव्हाण वैधकीय महाविद्यालय,शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय,शहरी रुग्णालयात यात हैदरबाग व शिवाजी नगर,कौठा,जगमवाडी, तसेच सर्व 16 उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयासोबत ग्रामीण भागातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसरी फेरी असणाऱ्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.त्यामुळे 18 ते 45 व 45 वर्षे वरील पात्र नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन अनावश्यक गर्दी करू नये,असे आवाहन डॉ.बालाजी शिंदे यांनी केले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago