नांदेड

उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत खा.चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड,बातमी24:- भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. जुना मोंढा येथील टाॅवर पासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,खा.अशोक चव्हाण आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, खासदार डॉ अजित गोपछडे, उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह मित्र पक्षाचे प्रमुख उभे होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मिरवणूकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक हनुमान टेकडी, गुरूद्वारा, तारासिंग मार्केट, महावीर चौक, वजिराबाद, शिवाजी पुतळा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. रस्त्यात ठिकठिकाणी उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, अशोकराव चव्हाण, यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खासदार अजित गोपछडे, आमदार डॉ तुषार राठोड, शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ संतुक हंबर्डे, किशोर देशमुख, शिवसेनेचे आनंद बोंडारकर, गंगाधरराव बडुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप धर्माधिकारी, शहराध्यक्ष जीवन घोगरे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, बापूसाहेब देशमुख, माजी शहराध्यक्ष चैतन्य बापु देशमुख, श्रावण भिलवंडे, साहेबराव गायकवाड, माजी सभापती आनंद पाटील ढाकणीकर, उपसभापती नरेंद्र गायकवाड, महीला आघाडीच्या श्रद्धा चव्हाण, गोरे, सुशीलकुमार चव्हाण, दिपक रावत राजु गोरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago