नांदेड

पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणले;सीईओ स्पष्ट केली भूमिका

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेत नुकत्याच रुजू झालेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी नियमन पाळून कामे करावे,अन्यथा त्या इशारा देण्यास विसरल्या नाहीत.त्यामुळे विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणल्याची चर्चा सोमवारी जिल्हा परिषदेत होती.

जिल्हा परिषद सीईओ राहिलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.त्यांच्या बदलीच्या जागी नंदुरबार आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायय जिल्हाधिकारी मीनल करनवाल या जिल्हा परिषद सीईओ म्हणून रुजू झाल्या आहेत.सोमवारी त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

या बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना संबोधित करताना कामे करत असताना होणाऱ्या चुका ग्राह्य धरू शकते.चूक दुरुस्त करून कामे करा,लोकांपर्यंत आपण पोहचलो पाहिजे,कामे अडगळीत पडता कामा नये,अशी स्पष्ट ताकीद देत त्यांनी माझ्यापासून लपविण्याचा किंवा खोट बोलण्याचा प्रयत्न केला,तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही.यात बिलकुल क्षमा केली जाणार नाही,मला खोटं बोलणं सहन होत नाही.

त्यामुळे विभागप्रमुखांनी प्रामाणिकपणे कामे करण्याचा प्रयत्न करावा,आणि जिल्हा परिषद लौकिक मिळवावा असे सीईओ श्रीमती करनवाल बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणल्याची चर्चा होती.तर काही विभाग प्रमुख यांनी सीईओ करनवाल यांच्या भूमिकेचे स्वागत केले.यावरून सोमवारी जिल्हा परिषदेत खमंग चर्चा रंगली होती.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago