नांदेड, बातमी24ः- वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी जिल्हयात पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही वाढ दि. 23 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे. या संबंधीचे आदेश रविवार दि.19 जुलै रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास काढण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी मागच्या सोमवारपासून संचारबंदी आदेश काढण्यात आले. या संचारबंदीचा नागरिकांकडून काटेकोरपणे अंमल केला गेला. मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोमवारी रात्री संपणारी संचारबंदी आता गुरुवारपर्यंत कायम असणार आहे. दि. 24 पासून अटी व शर्तीच्या अधिन राहून मिशन बिगेन अगेन नुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व खासगी आस्थापन चालू ठेवण्यात मुभा असणार असल्याचे आदेश नमूद करण्यात आले आहे.
——-
मागच्या आठ दिवसांपासनू नांदेड जिल्हयातील नागरिक लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आले आहेत. तसेच पालन पुढील काळात ही सर्वांना करायचे आहे. यासाठी सजग नागरिक म्हणून आपण सगळे खबरदारी घेऊन कोरोनाचे संकट संपवू, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…