नांदेड,बातमी24:-एक-दोन नव्हे तर 38 ग्रामसेवक यांना निलंबन करण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोबरे अचानक यु-टर्न घेतल्याने प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यी समिती गठीत करीत असल्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.
मुखेड येथील हंगरंगा येथील ग्रामसेवक यास निलंबित करण्यात आले होते.सदरचे निलंबन माघार घ्यावे,या मागणी विविध ग्रामसेवक संघटनांनी जिल्हा परिषद समोर दि.5 रोजी आंदोलन केले.सदरचे आंदोलन गैर असल्याचा मुद्दा लावून धरत आंदोलन करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
यासंबंधी निलंबनाची आदेश दि.6 रोजी ठोबरे यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 38 ग्रामसेवकांच्या निलंबनावर अचानक यु-टर्न घेत सदरचे निलंबन दबावात घेतके,असून माझ्या जीवितास धोका आहे.मला कुणीही विभाग प्रमुख यांनी सहकार्य केले नाही.मला नांदेड उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून कार्यमुक्त करावे,असे पत्र सीईओ यांच्या नावे लिहून मोठी खळबळ उडवून दिली.या प्रकरणाचे पडसाद आज जिल्हा परिषदेत उमटले.
या प्रकरणी कर्मचारी युनियनचे नेते बाबुराव पूजरवाड यांनी डॉ.सुधीर ठोबरे यांच्या समर्थनार्थ व्यापक आंदोलन केले.यात सर्व अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.आज सुद्धा ग्रामसेवक संघटना एकवटल्याचे बघायला मिळाले.
या प्रकारावर सीईओ वर्षा ठाकूर यांनी विभाग प्रमुख यांची बैठक घेतली.त्यानंतर विविध कर्मचारी संघटना यांच्याशी चर्चा केली.सोबतच मनसे पदाधिकारी सोबत ही संवाद साधला. निलंबन करण्यासाठी दबाव कुणी टाकला, कुणामुळे जीवितास धोका आहे,यासंबंधी चौकशी करण्यासाठी ठाकूर यांनी पाच सदस्यी समिती गठीत केली आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. माळोदे,प्रकल्प संचालक संजय तुबाकले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व विस्तार अधिकारी कैलास गायकवाड यांचा समावेश आहे.
——
मनसेकडून मारहाण
हगरगा येथील सरपंच प्रतिनिधी यास मनसेच्या पदाधिकारी यांनी मारहाण केली.यासंबंधीचा विडिओ जिल्हा परिषद ग्रुपवर व्हायरल झाला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…