नांदेड

खा.चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त आठशे पत्रकारांना विमा सुरक्षा कवचः सुनील रामदासी

नांदेड, बातमी24ः लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त जिल्ह्यातील आठशे पत्रकारांचा अपघात विमा काढण्यात आला, असून प्रमाणपत्र विविध दैनिकाचे कार्यालय तसेच घरपोच केले जाणार असल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील रामदासी यांनी दिली.

दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सुनील रामदासी म्हणाले, की गत वर्षांपासून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा मोफ त अपघाती विमा काढला जातो. जिवाची पर्वा न करता पत्रकार बांधव काम करत असतात, कसल्याही प्रकारचे संकट असो, ते तोंड देत चौथास्तंभ म्हणून भूमिका बजावत असतात.

अशा पत्रकारांवर अचानक अपघाती संकट कोसळल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हातभार लागला पाहिजे, या उद्देशाने छोटेस कार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकनेते तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त पत्रकार अपघाती विमा काढण्याचा उद्देश आहे. खासदार चिखलीकर हे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे नेतृत्व आहे. वाढदिवसानिमित्त पत्रकारांना अपघाती विमा संरक्षण देण्याचा सामाजिक प्रयत्न असल्याचे सुनील रामदासी यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago