नांदेड

दोन मृत्यू दोन दिवसांपूर्वी मात्र माहिती शनिवारी सकाळी

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात प्रशासनाकडून घोळ घालणे सुुरु आहे. प्रशासनाच्या प्रेसनोटमध्ये अपूर्ण माहिती असते. चूक एखाद्यावेळी होणे समजू शकत. परंतु वारंवार चुकीची व अर्धवट माहिती माध्यमांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रशासनाचा प्रकार नवा नाही. त्याउपरही दोन दिवसांपूर्वी झालेल्या मृत्यूची माहिती प्रशासनाकडून शनिवारी दिली जाते. मृत्यूची माहिती दोन दिवसांपूर्वी न कळविण्याचे कारण काय? यासंबंधी ठोस उत्तर जिल्हा शल्यचिकित्सांना ही देता आले नाही. यावरून प्रशासनाच डोक ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न सामान्यांना पडू लागला आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 569 इतकी झाली आहे. दिवसाकाठी रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचा आकडा एक-दोनने वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली आहे. प्रशासनाकडून कोरोनाची सविस्तर माहिती मिळण्याची अपेक्षा पत्रकारमंडळीसह वाचकांनी सोडून दिलेली आहे. इतर जिल्ह्यात रुग्ण वाढले, की प्रेसनोट काढून माहिती कळविली जाते. नांदेडमध्ये मात्र दिवसभरात रुग्ण वाढले, तरी सायंकाळी पाच वाजेनंतर अहवाल दिला जातो, त्या अहवालात ही माहिती अपूर्ण असते.

 

शनिवारी सकाळी कोरेानामुळे दोन मृत्यूची माहिती देण्यात आली. यातील एक 33 वर्षीय महिलेस दि. 3 जुलै रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयात भरती असताना स्वॅब घेण्यास सहा दिवस का लागले आणि रुग्णालयात अ‍ॅडमीट केल्यानंतर लगेच स्वॅब का घेण्यात आला नाही. त्या महिलेचा मृत्यूनंतर स्वॅब घेतला गेला असेल,तर प्रशासनाने सहा दिवस नेमके त्या महिलेवर काय उपचार केले. ती महिला कोरोनातून बाहेर कशी काय येऊ शकली नाही. असो दि. 9 जुलै रोजी मृत्यू झाला तर त्याच दिवशी प्रशासनाकडून मृत्यूची माहिती का कळविण्यात आली नाही. त्यास दि. 11 जुलै रोजीची सकाळची का प्रतीक्षा करावी लागली. दि.9 रोजीची माहिती फ ार झाले शुक्रवार सायंकाळच्या प्रेसनोटमध्ये देता येऊ शकली असती.

 

नांदेड तालुक्यातील बहिममपुरा येथील 28 वर्षीय तरूणाचा मृत्यू सुद्धा दि. 9 रोजी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. या रुग्णाचा सुद्धा स्वॅब त्याच दिवशी पॉझिटीव्ह आला होता. याच रुग्णाच्या मृत्यूची माहिती त्याच दिवशी किंवा शुक्रवारी देता आली असती. मात्र आरोग्य प्रशासनाने तसे केले नाही. विशेष या रुग्णाचा मृत्यू 9 रोजी झाला असल्याचे कळविले असताना शनिवार दि. 11 जुलै रोजीच्या 11 जणांच्या स्वॅबमध्ये पॉझिटीव्ह आल्याचे कळविले आहे. नेमका मृत्यू कधी झाला. याबाबत संद्धिगता निर्माण होते. प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या माहितीवर कधीच ठाम नसते. यावरून दिसून येते. त्यामुळे कोरोनाच्या माहितीचा पोरखेळ झाला असेच म्हणावे लागणार आहे.

——
या दोन्ही रुग्णांचा स्वॅब मृत्यूनंतर कोरोना पॉझिटीव्ह आला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago