नांदेड,बातमी:-सेवेत असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या पाल्यानं त्यांच्या जागी सेवेत घेण्याचा शासन निर्णय महत्वकांक्षी मानला जातो. अशा 67 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी बुधवार दि.12 रोजी घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रतीक्षा उमेदवारांना लागून होती.ऐन दिवाळीच्या तोंडावर या उमेदवारांना नोकरीत समावून घेत, या उमेदवारांची दिवाळी गोड करण्यात आली आहे,या कामी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोबरे यांनी तंतोतंत यादी तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
67 उमेदवारांना विविध पदावर नियुक्ती देण्यात आली असून यामध्ये जेष्ठता शैक्षणिक पात्रतेनुसार 2 उमेदवारांना कनिष्ठ अभियंता पदावर ,2 जणांना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,एकास आरोग्य सेवक,3 जण पशुधन पर्यवेक्षक,23 जण कनिष्ठ सहायक तर 36 जणांना परिचर/शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…