नांदेड

तत्कालीन नियोजन अधिकारी कोलगणे यांना दीड वर्षांनी न्याय

 

नांदेड, बातमी24:नांदेड येथे तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांना कोणतेही कारण किंवा कुठल्याही प्रकारची शास्ती नसताना दीड वर्षांपासून शासनाने सेवेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यांना शासनाने दीड वर्षानंतर पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथील नियोजन उपायुक्त म्हणून पदोन्नतीने रुजू होण्यासाबधी आदेश काढले.या संबंधीचे आदेश दि.14 रोजी प्राप्त झाले.

एक कर्तव्य दक्ष अधिकारी अशी संजय कोलगणे यांची प्रशासनात ओळख आहे.  प्रशासकीय सेवेत विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदावर जबाबदारी पार पाडली.यापूर्वी यशदा, पुणे, बार्टी पुणे येथे विषय तज्ञ म्हणून वर्ग 1 वर्ग2 कर्मचार्यांना विभागांतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन.एमपीएससी साठी पुस्तकांचे लिखाण,उपसंचालक समाजकल्याण पुणे येथे कार्यरत असताना सामाजिक न्याय विभागांतर्गत ” वाटचाल सामाजिक न्यायाच्या दिशेने” या पुस्तकाचे लिखाण, लातूर येथे मुद्रा बँक योजनेनंतर्गत यशस्वी लघु उधोजकांचे व व्यावसायिकांचे मनोगत यावर लिखाण व प्रकाशन तत्कालीन अर्थमंत्री यांनी केले.

कोलगणे यांना उपायुक्त नियोजन, पुणे या महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली. नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असूनही येथील कार्यकाळ पूर्ण करण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची खंत कोलगणे यांनी व्यक्त केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago