नांदेड,बातमी 24:-मनपा, नगरपालिका, ग्रामीण भागात बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी वाळु, रेती विकत घेताना वैध पावती व परवाना असल्याशिवाय खरेदी करु नये. अन्यथा संबंधीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील जप्त रेती साठयाच्या लिलावाच्या अनुषंगाने करावयाची कार्यपध्दती शासन निर्णय 3 सप्टेंबर 2019 अन्वये निश्चीत करण्यात आलेली आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्या ठिकाणी रेती साठे आढळुन येत आहेत. लिलाव झालेला नसताना येवढया मोठया प्रमाणात रेती साठे उपलब्ध असणे हे अवैध उत्खनन व वाहतुकीव्दारे उपलब्ध असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी रेती साठा करत असताना अशी रेती ज्यांच्या कडुन घेतली आहे. त्याबाबतची वैध पावती किंवा इतर सक्षम पुरावा संबंधीत बांधकाम करणाऱ्या मालकाकडे असणे आवश्यक आहे. जर असा पुरावा संबंधीत मालकाकडे नसेल तर अशा खाजगी जमीनधारक, बांधकाम व्यावसायिक यांचे विरुध्द महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, 1966 मधील कलम 48 मधील पोट कलम (7) व (8) नुसार दंडात्मक कार्यवाही किंवा इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.
0000
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…