नांदेड

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा प्रारंभ

नांदेड, बातमी24 :- जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 चा प्रारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निस्सार तांबोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांची उपस्थिती होती.

या रॅलीस जिल्हाधिकारी कार्यालय येथून पोलीस अधिक्षक कार्यालय-कलामंदिर, आयटीआय-वर्कशॉप कॉर्नर-भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जुना हॉटेल चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने निघून आयटीआय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत जिल्हाभरातून विविध सायकल ग्रुपचे सदस्य, शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. या रॅलीचा समारोप प्रसंगी रस्ते सुरक्षेवर बनविण्यात आलेल्या साहित्याचे विमोचन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते झाले.

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी रस्ते सुरक्षा अभियानाचे स्वरुप, उद्देश व आगामी महिन्याभरात होणाऱ्या जनजागृतीपर कार्यक्रमाचे विवेचन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago